मुंबई : राज्याच्या राजकारणात एक छोटेखानी पक्ष अशी ओळख असली तरीही ज्या पक्षातील प्रत्येक हालचालीवर विरोधकांचं सातत्याने लक्ष असतं अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी अधिवेशन मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलं आहे. राज ठाकरे स्वत: या अधिवेशनासाठी उपस्थित असून, पक्षाची पुढील वाटचाल या अधिवेशनातूनच स्पष्ट होणार आहे.
मनसेच्या याच राज्यव्यापी अधिवेशनामध्ये अध्यक्षपदी असणारे राज ठाकरे यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असतानाच दुसरीकडे लक्ष असणार आहे ते म्हणजे अमित ठाकरे यांच्याक़डे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, हे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. शिवाय वडिलांच्या सभांना उपस्थिती राहण्यासोबतच राजकीय वर्तुळात त्यांचा वावरही लक्ष वेधून जात आहे. त्यामुळे राज्यव्यापी अधिवेशनाच्याच दिवशी अमित ठाकरे यांचं सक्रिय राजकारणाच्या विश्वात औक्षण केलं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचा : मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशन दिवसाच्या लाईव्ह अपडेट्स
अमित ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील एका महत्त्वाच्या पक्षाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता ही जबाबदारी कोणती याचीच उत्सुकता आहे. सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणात युवा पिढीचं नेतृत्त्व पाहता या यादीमध्ये अमित ठाकरेंच्या नावाचाही समावेश झाला आहे. आता त्यांच्या कामाकडे राज्या राज्याच्या नजरा असतील. ठाकरे कुटुंबातील नव्या पिढीमधून आदित्य ठाकरे सध्या मंत्रीपद भूषवत आहेत. तेव्हा आपल्या राजकीय कारकिर्दीत अमित ठाकरेंकडूनही अनेकांच्याच अपेक्ष असतील हे नाकारता येणार नाही.
अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग होणार?