मुंबई : शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले आहेत.
एका कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. युवा अनस्टॉपेबल आणि तालीम औ तर्बियत या संस्थांनी एकत्रीत येऊन मुंबईतल्या शाळांच्या सबलीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
या मार्फत वांद्रे येथील अंजुमन इस्लाम गर्ल्स हायस्कूलमध्ये 60 शौचालयं आणि जलसुविधांचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना नक्वी यांनी सबका साथ सबका विकास हीच मोदी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगीतलं आहे.