Mumbai Cab Touched Audi: मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपरवर महाकाय होर्डिंग कोसळल्याची घटना काही महिन्यांपुर्वी घडली होती. आता मुंबईतल्या पेट्रोल पंपवर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. माणसाच्या मनातील रागावर नियंत्रण नसले की तो काहीही करु शकतो, याची प्रचिती देणारा व्हिडीओ समोर आलाय. यात ओला चालकाला वर उचलून जमिनीवर आपटण्यात आलय. कसा घडला हा प्रकार? या घटनेचं पुढे काय झाल? सविस्तर जाणून घेऊया.
समोर आलेल्या व्हिडीओनुसार, एक ऑडी क्यू 3 कार पेट्रोल पंपावर उभी आहे. तिच्या मागे एक असून कॅब चालकदेखील पेट्रोल भरण्यासाठी आलेला दिसतो. कॅब चालक तात्काळ ब्रेक लावतो पण त्याची गाडी ऑडीला घासते. यानंतर तो आपली गाडी मागे घेतो.
Mumbai Road Rage VIDEO:
Man slaps #ola driver & #smashes him to ground after cab brushes his #Audi Q3 in ghatkopar.
Police have registered case against Husband and wife. #Mumbai #India #RoadRage pic.twitter.com/7g024L5wvQ— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) August 30, 2024
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार ऑडीमधून एक महिला बाहेर येते. ती ऑडीच्या मागच्या बाजूला काय लागलंय का? ते पाहते. दरम्यान ऑडीमधून चालक बाहेर येतो. तो कॅबचा दरवाजा उघडतो आणि कॅब चालकाला खेचून बाहेर काढतो. 19 ऑगस्ट 2024 रोजी ही घटना घडली होती.
ऑडीला खरचटल्याने चालक संतप्त झाला. त्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने कॅब चालकाना कानाखाली मारल्या. मारत मारत तो चालकाला कॅबच्या मागे घेऊन जातो. यानंतर त्याला दोन्ही हाताने वर उचलतो आणि जोरात खाली आदळतो. कॅब चालकाना यामुळे खूप जोरात लागतं. त्याला बसलेला मार इतका जबर असतो की कॅब चालक काही वेळ बेशुद्ध पडतो. काही वेळात लोक तिथे पोहोचतात. पण ऑडी वाला आपली पत्नीला घेऊन गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो.
ही घटना घडून 10 दिवस झाल्याचे सांगण्यात येतंय. याचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतंय. ज्यामध्ये लोक ऑडी चालकाला खूप शिव्या घालतायत.ऑडी चालकाचे नव ऋषभ चक्रवर्ती आणि त्याच्या पत्नीचे नाव अंतरा घोष असे आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे दोघे मुळचे पश्चिम बंगालचे राहणार आहेत. पीडित कॅब ड्रायव्हरचे नाव कैमुद्दीन मोइनद्दीन कुरेशी असे असून तो अवघ्या 24 वर्षांचा आहे. कुरेशी याच्या डोक्याला गंभीर दुखावत झाली आहे. या घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. आता त्याची तब्बेत ठीक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. लोकं ऑडी चालकावर भडकली आहेत. आरोपी दाम्प्यतावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियातून होतेय.