Mumbai Crime : मुंबईच्या (Mumbai News) वडाळा (Wadala) भागातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. वडाळ्यात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह एका बॅगेत सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते बॅगमध्ये भरण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.
मुंबईतील वडाळा परिसरात ट्रकच्या मागे एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेचे वय अंदाजे 30-40 वर्षे आहे. महिलेच्या शरीराचे तीन तुकडे केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एक पाय आणि डोके आणि धड पोलिसांना सापडले आहेत. महिलेचा दुसरा पाय गायब आहे. बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या ट्रॅक पेट्रोलिंग कर्मचार्यांना वडाळा परिसरात हा मृतदेह दिसला होता. त्यानंतर वडाळा पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला.
Mumbai: We have recovered the half-burnt body of an unidentified woman from the Wadala area. Our patrolling team at Mumbai Port Trust had found a suspicious bag that contained a burned body. We sent the body for postmortem. Case of murder registered against an unknown accused and…
— ANI (@ANI) October 27, 2023
पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासोबतच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानेही आरोपींचा शोध सुरू केला आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. एक ते दोन दिवसांपूर्वी महिलेची हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. महिलेचा मृतदेह एका बॅगमध्ये होता. पोलिसांना संशय आल्यानतंर तपासणी केली असता त्यामध्ये महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आला.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.