सचिनने शेअर केला त्याच्या बालपणीचा फोटो...

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकताच त्याचा लहानपणीचा एक फोटो शेयर केला. त्यात त्याच्या हातात एक पुस्तक आहे. सचिनचे लहानपणीचे अनेक फोटो आपण पाहिलेत. पण हा फोटो पहिल्यांदाच सर्वांसमोर आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिलंय की, 'मी या क्षेत्रात कधीच चांगलं स्कोअर करणारच नव्हतो.’ 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 7, 2017, 10:07 PM IST
सचिनने शेअर केला त्याच्या बालपणीचा फोटो...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकताच त्याचा लहानपणीचा एक फोटो शेयर केला. त्यात त्याच्या हातात एक पुस्तक आहे. सचिनचे लहानपणीचे अनेक फोटो आपण पाहिलेत. पण हा फोटो पहिल्यांदाच सर्वांसमोर आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिलंय की, 'मी या क्षेत्रात कधीच चांगलं स्कोअर करणारच नव्हतो.’ 

क्रिकेटची पूजा करणाऱ्या सचिनला शिक्षणात रस नव्हता, हे त्याचे चाहते जाणतात. पण सचिनने हा फोटो शेयर करून जुन्या आठवणी पुन्हा जागवल्या आहेत. फोटो शेयर करताच त्याला हजारो लाईक्स मिळाले. इतकंच नाही तर अनेकजण हा फोटो शेयर करत आहेत. 
सचिनने हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर शेयर केला. ट्विटरवर या फोटोवर अनेक कंमेंट्स येत आहेत. 

क्रिकेटचे मैदान गाजवणारा आणि अनेक विक्रम स्वतःच्या नावावर करणारा सचिन आपण शिक्षणात चांगले नसल्याचे प्रामाणिकपणे काबुल करतो.