पहिल्यांदाच शिवसेनेचे 2 दसरा मेळावे, पण राज ठाकरे दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे कुठे असणार आहेत.

Updated: Oct 3, 2022, 04:43 PM IST
पहिल्यांदाच शिवसेनेचे 2 दसरा मेळावे, पण राज ठाकरे दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी title=
Raj Thackeray on dasara

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट असा संघर्ष (Shinde vs Thackeray) पाहायला मिळत नाही. दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टात (SC) पोहोचला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आम्हीच शिवसेना असल्याचं ते सुरुवातीपासून बोलत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून त्यांच्यावर सतत टीका सुरुये. धनुष्यबाण या चिन्हावर देखील ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलाय. पण हे प्रकरण आता निवडणूक आयोगाच्या समोर आहे. एकनाथ शिंदे गटाने दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) देखील दावा केला होता. त्यासाठी त्यांनी शिवतिर्थावर परवानगी देखील मागितली होती. पण हायकोर्टाने त्यांना परवानगी नाकारली होती. (Raj Thackeray in pune on dasara)

शिंदे गटाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी बीकेसीवर (BKC) मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता जोरदार तयारी सुरु झाली आहे. दोन्ही गट यावेळी शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी नियोजन सुरु आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील आमंत्रण दिलं जाणार असं बोललं जात होतं. पण ही शक्यता आता मावळली आहे. कारण दसऱ्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष हे मुंबईत नसणार आहेत.

दसऱ्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj thackeray) हे पुण्यात असणार आहे. शिवसेनेचा शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. पण या रणधुमाळीच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र पुण्यात असणार आहेत.

मनसे अध्यक्ष खरंच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणार का अशी उत्सूकता लोकांमध्ये होती. पण ती शक्यता आता धुसर झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात असणार आहेत.