जाणून घ्या 'अनलॉक'दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा

राज्याची एकूण रुग्णसंख्या ९४,०४१ वर पोहोचली आहे.

Updated: Jun 10, 2020, 09:31 PM IST
जाणून घ्या 'अनलॉक'दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा
संग्रहित फोटो

मुंबई : देशात coronavirus कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रातही काही वेगळं चित्र नाही. काही दिवसांपूर्वीच राज्यात लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करत राज्य सरकारकडून काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली. राज्यात नव्याने सुरु झालेल्या अनलॉकच्या या काळात कोरोना रुग्णांच्या आकड्यावर याचा नेमका कसा परिणाम होत आहे, ही बाब अधिक स्पष्ट होऊ लागली आहे.

बुधवारी राज्यात कोरोना रुग्णांमध्ये ३२५४ इतक्या संख्येने वाढ झाली. तर, राज्यात एकूण १४९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

मुंबई 'अनलॉक'च्या दिशेने, पण ५० लाख लोकं कंटेनमेंट झोनमध्येच

नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा पाहता सध्या महाराष्ट्रात एकूण ४६,०७४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ९४,०४१ वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण राज्यात ४७.३४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर, राज्यातील मृत्यूदर  ३.६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावादमध्ये आतापर्यंत राज्यात ५,६९,१४५ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, २७,२२८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  

...नाहीतर पुन्हा लॉकडाऊन - उद्धव ठाकरे

मुंबईतून दिलासादायक बातमी

देशात कोरोना व्हायरसची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याची बाब निदर्शनात आली आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येची दुपटीने वाढ होण्याचं प्रमाण १६ दिवसांचं असताना मुंबईत हे प्रमाण किंवा हे अंतर मात्र २४.५ दिवसांवर पोहोचलं आहे.

मुंबईकरांनो कोरोनाबाबतची ही मोठी बातमी वाचली का?