सलमान खानची नवी गर्लफ्रेंड विवाहित!

ज्या लुलिया वंटुरसोबत सलमान खानचं प्रेम प्रकरण सध्या गाजत आहे, ती लुलिया चक्क विवाहित आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 7, 2013, 03:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सलमान खानचं नवं प्रेम प्रकरण सुरू झाल्या झाल्याच वादात सापडलं आहे. सलमान खानच्या नशिबात विवाहाचा योग कधी आहे, हे कुणालाच सांगता येत नाही. ज्या लुलिया वंटुरसोबत सलमान खानचं प्रेम प्रकरण सध्या गाजत आहे, ती लुलिया चक्क विवाहित आहे.
आत्तापर्य़ंत अनेक मुलींनी सलमान खानशी मैत्री वाढवून बॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं आहे. अनेक वेळा त्यानंतर सलमान खानची फसवणूकच झाली. तरीही सलमान खान दर वेळी नव्या विदेशी युवतीला घेऊन तिला बॉलिवूडमध्ये दाखल करत असतो. सध्या त्याचं नाव लुलिया वंटुर यारोमानियन टीव्ही अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. सलमान खानने तिच्यासाठी आपल्या जवळ एक घर पण मिळवून दिलं. ‘मेंटल’ सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमान आणि लुलिया एकमेकांसोबत सगळीकडे फिरताना दिसले होते. या दोघांनी गुप्तपणे विवाह केल्याच्याही वावड्या काही दिवसांपूर्वी उठल्या होत्या. त्याचं खंडन सलमानच्या वडलांनी केलं. मात्र ही लुलिया चक्क विवाहित आहे. ग्रॅमी नॉमिनेटेड म्युझिशियन मेरिस मोगा याच्याशी लुलियाचा विवाह झाला आहे.
लुलिया गेले तीन महिने मुंबईमध्ये सलमान खानच्या घरी त्याच्या कुटुंबासोबत राहात आहे. तसंच मुंबईत बऱ्याच ठिकाणी लुलियाला सोबत घेऊन सलमान खान जाताना दिसतो. मात्र लुलिया आणि सलमान खानच्या लग्नाची शक्यता मावळली आहे. कारण, लुलियाचं मेरिस मोगाशई यापूर्वी प्रेम प्रकरण असून नुकताच तिने त्याच्याशी विवाह केला आहे. त्यामुळे आता सलमान खानची नवी गर्लफ्रेंड कोण असे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.