www.24taas.com,नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम यांच्या टू जी घोटाळ्यातील भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्य न्यायालयाने फेटाळल्या. त्यामुळे चिंदबरम् यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दाखल करण्यात याचिकेद्वारे टू जी घोटाळा प्रकरणात चिंदबरम् यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली होती. आज झालेल्या सुनावणीच्यावेळी या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
पी चिदंबरम यांच्याविरोधात सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या ग्राह्यतेवर निर्णय होणार होता टू जी घोटाळ्याच्या काळात पी. चिदंबरम अर्थमंत्री होते त्यामुळे चिदंबरम यांची नेमकी भूमिका काय होती याचा तपास करण्यात यावा या मागणीसाठी यापूर्वी सीबीआय कोर्टात अर्ज केला होता.
मात्र सीबीआय कोर्टानं तो फेटाळला. त्यामुळे त्याला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात केली होती. मात्र, यामुळे सीबीआयला धक्का बसला आहे.
टू जी घोटाळ्यात अर्थमंत्री यांचीही भूमिका संशयास्पद असल्याची याचिका प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल करणार असल्याचं याचिकाकर्त्यानं सांगितलंय. तर या निर्णयावर काँग्रेसला हुरळून जाण्याचं कारण नसल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिलीय.