close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

Updated: Mar 21, 2017, 06:57 PM IST
आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

लखनऊ : उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

लंकास्थित प्रोफेसर कॉलनीत छापा टाकत पोलिसांनी विद्यार्थी असलेल्या अब्दुल रज्जाक याला अटक केल्याचं वृत्त 'न्यूज 18'नं दिलंय. अब्दुल पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. 

अब्दुलच्या फेसबुकवर आदित्यनाथ यांचा एक फोटो शेअर झाल्याचं दिसल्यानंतर हिंदू युवा वाहिनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता.

अब्दुलविरुद्ध आयपीसी कलम 499 आणि आयटी अॅक्ट 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.