देशांतील आठ राज्ये दहशतवादयांच्या निशाण्यावर, अलर्ट जारी

राजधानी दिल्ली, पंजाबसह भारतातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय. आयबीच्या इशाऱ्यानंतर या भागात अलर्ट जारी करण्यात आलाय. आयबी रिपोर्टनुसार, दिल्ली, राजस्थान आणि पंजाबसह उत्तर भारतातील आठ राज्ये दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे आयबीने सांगितलेय

Updated: Dec 13, 2015, 04:19 PM IST
देशांतील आठ राज्ये दहशतवादयांच्या निशाण्यावर, अलर्ट जारी title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली, पंजाबसह भारतातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय. आयबीच्या इशाऱ्यानंतर या भागात अलर्ट जारी करण्यात आलाय. आयबी रिपोर्टनुसार, दिल्ली, राजस्थान आणि पंजाबसह उत्तर भारतातील आठ राज्ये दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे आयबीने सांगितलेय. 

राजस्थानचे जयपूर, अजमेर, जोधपूर आणि सीकरमधील पर्यटक तसेच धार्मिक स्थळे खासकरुन दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. या राज्यांमध्ये तसेच धार्मिक स्थळे, मॉल आणि पर्यटन स्थळांसह अनेक महत्त्वांच्या भागांमधील सुरक्षा वाढवण्यात आलीय.

याव्यतिरिक्त रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड परिसरातही सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत. आयबीच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आलीये. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.