लंडन : ब्रिटिश भारतीय खासदार किथ वाज यांनी जगप्रसिद्ध 'कोहिनूर हिरा' भारताला परत करण्याचे आवाहन मंगळवारी केले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे ऑक्सफर्ड युनियनमध्ये केलेल्या भाषणावर केलेली हि प्रतिक्रिया आहे.
आर्थिक मालमत्ता परत करणे हे फारचं किचकट तसेच वेळखाऊ प्रकार आहे, पण कोहिनूर हिऱ्यासारखी अमुल्य वस्तू परत न करण्यात कुठलेही निमित्त चालणार नाही, असे वक्तव्य मूळचे आशियायी असणारे किथ वाज यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला ब्रिटनचा दौरा नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून भारतात परत जाताना, ते ही चांगली बातमी घेऊन जाऊ शकतील असेही वाज यांनी म्हटले आहे.
मध्य युगात आंध्रप्रदेशमधील गुंटुर जिल्ह्यात हा कोहिनूर हिरा काढला गेला होता. हा जगातील सगळ्यात मोठा हिरा मानला जात होता.
सुरवातीपासूनचं या हिऱ्याचा मालकी हक्क काकतीय राजवंशाकडे होता. त्यानंतर या राजाने एका मंदिरात देवीचा डोळा म्हणून या हिऱ्याची स्थापना केली होती.
या हिऱ्यावर बरीचं आक्रमणे झाली आणि शेवटी तो ब्रिटिश शासनाकडे जाऊन पोहोचला. तेव्हापासूनचं हा हिरा ब्रिटनचीकडे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.