नवी दिल्ली : अफगानिस्तानच्या हार्ट ऑफ आशिया सम्मेंलनात भाग घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या पाकिस्तानात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील वर्षी पाकिस्तानच्या दौऱ्यावर येतील अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिल्याचं पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.
दक्षिण आशिया सहयोग संघाची बैठक पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. त्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत मी ही असणार असल्याचं सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीला अशी माहिती दिली.
पंतप्रधान कार्यालयातून मात्र या बाबतची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पंतप्रधान मोदी पाकिस्तान गेलेत तर दोन्ही देशातील संबंधांवर काय परिणाम होईल याबाबतही उत्सूकता असेल.
सुषमा स्वराज यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.