पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रमवर हात साफ केला

Updated: Sep 2, 2014, 02:19 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रमवर हात साफ केला title=

 

टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज आगळंवेगळं रुप पहायला मिळालं. जपानच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात चक्क ड्रम वाजवलाय. एखाद्या व्यावसायिक वादकासारखे मोदी हा ड्रम वाजवत होते. 

नरेंद्र मोदी यांनी कालही एका संगीत विद्यालयाच्या भेटीदरम्यान बासरी वाजवून सर्वांना थक्क केलं होतं आणि आज त्यांनी ड्रमही वाजवला. टोकियोतील टीसीएसच्या एका कार्यक्रमात मोदींनी चक्क ड्रमवर आपला हात मोकळा केला.
 
विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान मोदी आणि एक जॅपनीज कलाकारामध्ये जुगलबंदी रंगली पाहायला मिळाली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मोदींचं अभिनंदन केलं. मोदींनी कालही एका संगीत विद्यालयाच्या भेटीदरम्यान बासरी वाजवून सर्वांना थक्क केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.