मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर जेसिया रामपाल हे एकमेकांशी काडीमोड घेणार आहेत... अशी बातमी सध्या मीडियाच्या माध्यमातून फिरतेय. पण, आपल्या नातेसंबंधांबद्दल अर्जुननं खुलासा करण्यासाठी आता सोशल वेबसाईटची मदत घेतलीय.
मुंबईच्या एका टॅब्लॉईडनं अर्जुन रामपाल आणि मेहेरनं बांद्रा कोर्टात काडीमोड घेण्यासाठी केस फाईल केल्याची बातमी दिलीय. अर्जुन आणि मेहेर यांचं १७ वर्षांपासूनचं नात हेलकावे घेत आहे... पण, आत्ताच त्यांच्या नात्याविषयी काहीही सांगता येणं कठिण आहे कारण दोघांनीही आपले निर्णय खूपच खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतलाय, असंही यात म्हटलं गेलंय. याच बातमीवर, अर्जुननं ट्विटरवर या टॅब्लॉईडला चांगलंच फैलावर घेतलंय.
My wife and I where at Bandra court filing a divorce?Say,Midday&few others.U know it's really easy to find that out.Did u bother? #fakepress
— arjun rampal (@rampalarjun) March 11, 2015
माझ्या पत्नीनं आणि मी बांद्रा कोर्टात काडीमोड घेण्यासाठी दावा दाखल केलाय किंवा नाही हे शोधून काढणं खूप सोप्पं आहे... पण तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का? असं म्हणत अर्जुननं या टॅब्लॉईडवर टीका केलीय. सोबतच, यापुढे आपण आपल्या खाजगी आयुष्याविषयी कोणत्याही मुलाखतीत बोलणार नसल्याचंही अर्जुननं म्हटलंय.
गेल्या वर्षी हृतिक रोशन आणि सुझान रोशन यांचा काडीमोड झाल्यानंतर अर्जुनही मेहेरशी काडीमोड घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, त्यानंतर हृतिक, सुझान आणि अर्जुननंही या बातम्यांना अफवा म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.