पुण्यात 'बाजीराव-मस्तानी' सिनेमाचे शो रद्द

बाजीराव पेशवे यांच्या वंशजानी वादग्रस्त गाणे वगळण्याची मागणी केली होती. मात्र, चुकीचे गाणे वगळण्यात न आल्याने 'बाजीराव-मस्तानी' सिनेमाचे शो बंद पाडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, भाजपच्या विरोधामुळे पुण्याच्या कोथरुडमधील सिटी प्राईड चित्रपटगृहातील 'बाजीराव-मस्तानी' चे शो रद्द करण्यात आलेत.

Updated: Dec 18, 2015, 09:30 AM IST
पुण्यात 'बाजीराव-मस्तानी' सिनेमाचे शो रद्द  title=

पुणे : बाजीराव पेशवे यांच्या वंशजानी वादग्रस्त गाणे वगळण्याची मागणी केली होती. मात्र, चुकीचे गाणे वगळण्यात न आल्याने 'बाजीराव-मस्तानी' सिनेमाचे शो बंद पाडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, भाजपच्या विरोधामुळे पुण्याच्या कोथरुडमधील सिटी प्राईड चित्रपटगृहातील 'बाजीराव-मस्तानी' चे शो रद्द करण्यात आलेत.

'बाजीराव-मस्तानी' सिनेमाविरोधात पुणे भाजपने आंदोलनाचा इशारा दिला होता. भाजपच्या विरोधामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनी चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. सिटी प्राईडमध्ये बाजीराव-मस्तानीचे एकूण तीन शो होणार होते. त्यात पहिला शो सकाळी आठ वाजता होता.  

अधिक वाचा : 'बाजीराव मस्तानी' रिलीज होऊ देणार नाही - पेशव्यांचे वंशज आक्रमक 

बाजीराव-मस्तानी सिनेमातून चुकीचा इतिहास दाखविण्यात आल्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित करु नये, असा इशारा भाजपने दिला होता. सिनेमागृहाचे नुकसानी टाळण्यासाठी सिटी प्राईडप्रमाणे पुण्यातील आणखी काही चित्रपटगृहातून या सिनेमाचे सकाळचे शो रद्द करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सिटी प्राईड सिनेमागृहाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. तसेच पुण्यातील अन्य चित्रपटगृहाबाहेरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 
 
या चित्रपटात बाजीराव यांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना पिंगा या गाण्यावर तसेच खुद्द बाजीरावांना सैनिकांसोबत नाचताना दाखवल्याने अनेकांच्या मनात संतापाची भावना आहे. वास्तवात असे कधी घडलेच नसल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात. मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नृत्याचे समर्थन केलेय.