अजिंक्य रहाणे दिसणार भावजींच्या 'होम मिनिस्टर'मध्ये

अजिंक्य राहणेने उखाणा घेतलेलं तुम्ही ऐकलं आहे का... नाही तर तुम्हांलाही ही संधी येत्या २२ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. 

Updated: Oct 19, 2015, 01:17 PM IST
 अजिंक्य रहाणे दिसणार भावजींच्या 'होम मिनिस्टर'मध्ये  title=

मुंबई : अजिंक्य राहणेने उखाणा घेतलेलं तुम्ही ऐकलं आहे का... नाही तर तुम्हांलाही ही संधी येत्या २२ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. 

मराठी मनात आणि घराघरात स्थान मिळवलेल्या आदेश बांदेकर यांच्या 'होम मिनिस्टर' या सुप्रसिद्ध कार्यक्रमात टीम इंडियाचा मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे दिसणार आहे. 

येत्या २२ ऑक्टोबर रोजी प्रसारित होणाऱ्या 'होम मिनिस्टर'च्या दसरा विशेष कार्यक्रमात अजिंक्य राहणे दिसणार आहे. हा विशेष कार्यक्रम २२ तारखेला सायंकाळी प्रसारित होणार आहे. 

पाहा त्याची एक झलक 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.