मला देशाचा ब्रँड अम्बेसेडर व्हायचंय - सलमान खान

'हिट अँड रन' प्रकरणी जामीन मिळालेल्या सलमान खानला आता देशाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायचं आहे. जम्मू काश्मीरचा ब्रँड अॅम्बेसेडर होणार का? असा सवाल विचारला असता मला ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचं असेल तर भारताचा होईन, असं सूचक विधान त्यानं केलं आहे. 

Updated: May 18, 2015, 03:55 PM IST
मला देशाचा ब्रँड अम्बेसेडर व्हायचंय - सलमान खान title=

श्रीनगर: 'हिट अँड रन' प्रकरणी जामीन मिळालेल्या सलमान खानला आता देशाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायचं आहे. जम्मू काश्मीरचा ब्रँड अॅम्बेसेडर होणार का? असा सवाल विचारला असता मला ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचं असेल तर भारताचा होईन, असं सूचक विधान त्यानं केलं आहे. 

सलमान खान सध्या जम्मू काश्मीरमध्ये 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून यादरम्यान सलमाननं जामीन मिळाल्यावर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'हिट अँड रन'प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी पाठिंबा देणारे चाहते आणि मित्रमंडळीचे सलमानने आभार मानले आहेत. 

सलमानने जम्मू काश्मीरचे ब्रँड अॅम्बेसेडर व्हावे यासाठी स्थानिक राज्य सरकारनं अथक प्रयत्न केले होते. जम्मू काश्मीर विषयी विचारलं असता सलमान म्हणतो, जम्मू खोऱ्यात चित्रिकरण करण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे, आता मी एका चित्रपटाचं चित्रीकरण केलं असलं तरी भविष्यात आणखी एका चित्रपटाचं चित्रीकरण याच राज्यात करीन असंही त्यानं सांगितलं. 

जम्मू काश्मीरचा ब्रँड अॅम्बेसेडरविषयी विचारलं असता सलमाननं त्यावर थेट नकार देणं टाळलं. एका राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्यापेक्षा मला देशाचा ब्रँड अॅम्बेसेडर व्हायला जास्त आवडेल असंही सलमान म्हणाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.