सलमानमुळे सूरज पांचोली सध्या तणावाखाली

सूरज पांचोली सध्या खूप तणावाखाली आहे, कारण आहे सलमान खान. मात्र या तणावासाठी कुणी त्याच्यावर दबाव टाकलेला नाही. त्यानं स्वत:च हा ताण आपल्या मागे लावून घेतलाय.

Updated: Sep 2, 2015, 02:21 PM IST
सलमानमुळे सूरज पांचोली सध्या तणावाखाली  title=

मुंबई: सूरज पांचोली सध्या खूप तणावाखाली आहे, कारण आहे सलमान खान. मात्र या तणावासाठी कुणी त्याच्यावर दबाव टाकलेला नाही. त्यानं स्वत:च हा ताण आपल्या मागे लावून घेतलाय.

खरं म्हणजे सूरजला सलमान खानला निराश करायचं नाहीय. सूरज पांचोली आणि अथिया शेट्टीचा 'हिरो' लवकरच रिलीज होतोय. त्यामुळंच सूरज नर्व्हस आहे. सलमान खान स्वत: सूरज आणि अथियाला लॉन्च करत आहे. हिरो असा चित्रपट आहे ज्यात आपल्या पहिल्याच चित्रपटात जॅकी श्रॉफने धमाल केली होती. 

आणखी वाचा - माझं नाव जियासोबत नेहमीच जोडलं जाईल- सूरज पांचोली

सूरज-अथियाला टायगर श्रॉफ आणि कृति सेनन या नव्या जोडीलाही टक्कर द्यायचीय. सलमान-भाग्यश्रीचा 'मैंने प्यार किया', ऋतिक-अमिषाचा 'कहो ना प्यार है' यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री करताच पहिला हिट सिनेमा दिला होता. ऋषी कपूर-डिंपल कपाडियाचा डेब्यू चित्रपट तर कुणीच विसरू शकत नाही. 

त्यामुळं हे सगळं पाहून सूरज पांचोली प्रेशरमध्ये आलाय. आता त्याची डेब्यू फिल्म हिट होते की फ्लॉप हे आगामी काळच सांगेल.

आणखी वाचा -  सलमानच्या आवाजातलं गाणं, 'मै हूँ हिरो तेरा'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.