जळगाव : शिवसेना आणि भाजपमध्ये पालिका निवडणुकीत वाद विकोपाला गेलेत. दोघांनी टोकाची टीका केली. विकासाबाबत तडजोड नाही, अस सांगत वेळप्रसंगी टेकू काढून घेऊ, असा इशारा शिवसेने दिल्यानंतर भाजप एकपाऊल मागे आल्याचे चित्र दिसत होते. त्याचवेळी महसूल मंत्री यांची सरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार आणण फार कठीण नाही, असा गौप्यस्फोट केलाय.
सरकार कोणत्याही परिस्थतीत गडगडणार नाही तशी व्यवस्था केल्याशिवाय तुम्हाला याची शाश्वती देत नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी जळगावात वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या जाहीर सभेत केलाय. त्याचवेळी दहा वीस आमदार आणणं फार कठीण नाही, असं सांगत सरकारला साथ द्या, असं आवाहन त्यांनी शिवसेनेला केलं.
दरम्यान, शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेणं परवडणारं नाही, असं रिपाइं खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय. आता एकनाथ खडसे यांच्या प्रतिक्रियेवर शिवसेना काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी ३ नोव्हेंबरला शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक होत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपबरोबरचे नाते संपविणार का, याचीच चर्चा सुरु झालेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.