औरंगाबाद : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांत टोले लगावलेत. इतक्या लवकर सरकारच्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू होईल असं वाटलं नव्हतं. पंकजा मुंडेंवर थेट बोलणं टाळून शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला. राज पुरोहितांच्या स्टिंगवरही त्यांनी खोचक टीका केली.
पंकजा मुंडे यांचे नाव न घेता, अशा लहानसहान व्यक्तींबाबत आपण बोलणार नाही, असं सांगतानाच, इतक्या लवकर भाजप सरकारमधल्या भ्रष्टाचाराची चर्चा होईल, असं वाटलं नसल्याचा टोला शरद पवारांनी लगावला.
त्याचप्रमाणे राज पुरोहित यांचं स्टिंग भाजपमधली खदखद दाखवत असल्याचंही ते म्हणाले. तर भुजबळांवर अन्याय झाल्याचंही पवार यावेळी म्हणालेत.
फडणवीस सरकारची जी काही वाटचाल सुरू आहे ती अशीच चालत राहावी. त्यामुळे मीडियाला खाद्यं मिळत राहिलं आणि मीडिया जनतेला बरोबर पुरवेन, असा टोलाही पवारांनी लगावला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.