शिक्षणाच्या नावाखाली सुरू होतं हुक्का पार्लर, पोलिसांचा छापा

उत्तर नागपूरच्या जरीपटका भागात एका दोन मजली इमारतीत सिक्रेट रूममध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकलाय. यात 9 जणांना पोलिसांनी अटक केलीय. आरोपींमध्ये हुक्का पार्लरचा मॅनेजर विनोद देवानी आणि काही विद्यार्थी आहेत, जे अभ्यासाचं कारण देत हुक्का पार्लरमध्ये मजा-मस्ती करायचे.

Updated: Jul 8, 2015, 06:35 PM IST
शिक्षणाच्या नावाखाली सुरू होतं हुक्का पार्लर, पोलिसांचा छापा title=

नागपूर: उत्तर नागपूरच्या जरीपटका भागात एका दोन मजली इमारतीत सिक्रेट रूममध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकलाय. यात 9 जणांना पोलिसांनी अटक केलीय. आरोपींमध्ये हुक्का पार्लरचा मॅनेजर विनोद देवानी आणि काही विद्यार्थी आहेत, जे अभ्यासाचं कारण देत हुक्का पार्लरमध्ये मजा-मस्ती करायचे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जरीपटका भागात इटारसी पुलावर एका दुमजली घर आहे. पोलीस निरिक्षक दीपक खोब्रागडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांच्या पथकानं घरावर छापा टाकला. तेव्हा तिथं सुरू असलेलं हुक्का पार्लर उघडकीस आलं. परेश नावाच्या व्यक्तीनं या खोल्या हुक्का पार्लरसाठी भाड्यानं घेतल्या होत्या. अनेक दिवसांपासून गुप्तपणे इथं हुक्का पार्लर सुरू होतं. 

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा एक तरुण विद्यार्थ्यांचं जोडपं पण तिथं होतं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मित्राच्या घरी अभ्यास करायला जातो म्हणून हे विद्यार्थी हुक्का पार्लरमध्ये येत होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.