जळगाव : याकूब मेमन हा एक आतंकवादी आहे आणि त्याला शिक्षेपासून वाचविण्यासाठी असदुद्दीन ओवेसी जर वायफळ बडबड करत असेल तर त्याला पाकिस्तानात पाठविण्याची गरज असल्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे.
जळगावातील अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते. ते म्हणाले की, 'याकूब मेमन हा १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्याकडे सरकार आणि कोर्ट एक हिंदू किंवा मुसलमान म्हणून पाहत नसून, तो एक आतंकवादी आहे.
कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला फाशी झालीच पाहिजे. ओवेसी हे याकूब प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करताहेत. भारतात राहून एखादी व्यक्ती भारतीय न्यायव्यवस्थेचा सन्मान करीत नसेल, पाकिस्तानचे गोडवे गात असेल तर त्याला पाकिस्तानात पाठवा, अशी सडेतोड प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.