मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे. 

Updated: Jul 15, 2014, 08:31 PM IST
मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी title=

मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे. 

मुंबईत हिंदमाता, परळ, अंधेरीमध्ये पाणी साचायला सुरुवात झालीय. तर मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत आहेत.  

हार्बर रेल्वेची लोकलही 15 ते 20 मिनिटं उशीराने सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरची वाहतूकही खोळबंली आहे.

ठाण्यातही जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर एलबीएस हायवेही पाण्याखाली गेला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.