'बाहुबली २'नंतर मुंबई पोलिसांची कल्पकबुद्धी! नागरिकांना केला सवाल...

'बाहुबली २' आणि या सिनेमाशी संबंधित 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं' हा अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा प्रश्न मुंबई पोलिसांनीही उचलून धरलाय. 

Updated: Apr 29, 2017, 01:12 PM IST
'बाहुबली २'नंतर मुंबई पोलिसांची कल्पकबुद्धी! नागरिकांना केला सवाल...  title=

मुंबई : 'बाहुबली २' आणि या सिनेमाशी संबंधित 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं' हा अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा प्रश्न मुंबई पोलिसांनीही उचलून धरलाय. 

या सिनेमाच्या क्रेझचा फायदा घेत मुंबई पोलिसांनी 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं' याशिवाय मुंबईकरांसाठी आणखी एक सवाल केलाय... आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना तुमच्या-आमच्याकडून अपेक्षित आहे. 

हा प्रश्न त्यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना विचारलाय.... आणि तो प्रश्न आहे 'नागरिक वाहतूक नियम का पाळत नाहीत?'... या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासकडे असेल तर #BahubaliOfTrafficDiscipline या हॅशटॅगसहीत नक्की उत्तर द्या...