शिवसेनेचा भाजपला शह देण्याचा प्रयत्न...

कळीच्या बनलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांचा 'वार' आता शिवसेनेनं भाजपवरच उलटवलाय. 'पालिकेप्रमाणे कॅबिनेट बैठकीतही पारदर्शकता असावी' अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. 

Updated: Mar 3, 2017, 02:05 PM IST
शिवसेनेचा भाजपला शह देण्याचा प्रयत्न...  title=

मुंबई : कळीच्या बनलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांचा 'वार' आता शिवसेनेनं भाजपवरच उलटवलाय. 'पालिकेप्रमाणे कॅबिनेट बैठकीतही पारदर्शकता असावी' अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. 

'वर्षा'वर शिवसेना नेत्यांची ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पार पडली. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यानी मुंबई महापालिकेप्रमाणे राज्य मंत्री मंडळ बैठकीचा कारभारही पारदर्शक पद्धतीनं व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.  

यासाठी लोकायुक्त आणि पत्रकारांचाही समावेश करण्यात यावा, अशीही शिवसेनेची मागणी आहे. या मागणीवर विचार करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. 

या बैठकीसाठी एकनाथ शिंदे, दिवाकर रावते आणि दीपक सावंत उपस्थित होते.