प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक

डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.

Updated: Sep 1, 2015, 01:15 PM IST
प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक

हैदराबाद: डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.

आणखी वाचा - व्हिडिओ: दिवसाढवळ्या तलवारीचे वार करून हत्या, विचलित करणारे दृश्य

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या राजीव गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावर एक दक्षिण आफ्रिकन महिला दुबईहून आली होती. नारकोटिक्स कंट्रोल बोर्ड (एनसीबी) च्या अधिकाऱ्यांनी जेव्हा महिलेला पाहिलं त्यांना संशय आला. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तिनं आपण सात महिन्याची गरोदर असल्याचं सांगितलं. पण अधिकाऱ्यांना तिचा संशय येत होता.

मूसिया मूसा असं त्या ३२ वर्षीय महिलेचं नाव आहे. मग महिलेला विमानतळाजवळील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं तपासलं असता तिनं सांगितलं की, पोटामध्ये अंमली पदार्थांचे पाकिटं लपवले आहेत. यानंतर हैदराबादच्या उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलं. 

आणखी वाचा - एका तरूणाच्या कानातून डॉक्टरांनी काढले २६ झुरळं...

तिथं डॉक्टरांच्या टीमनं ड्रग्जचे १६ पाकिटं काढली. नंतर सोमवारी पुन्हा २४ पाकिटं काढण्यात आले. मूसानं अंमली पदार्थांचे हे पाकिटं आपल्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात टाकले होते. डॉक्टरांनीही त्याच मार्गाने हे पाकिटं काढले. त्यामुळं तिची कोणतीही शस्त्रक्रिया केली गेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत हस्तगत केलेल्या पाकिटांमधून ४५० ग्राम अंमली पदार्थ आहे. ज्यात कोकेनचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १ कोटी रुपये आहे. महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या इतर सहकाऱ्यांना ट्रेस करण्याचं काम सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.