www.24taas.com, नागपूर
‘मी तर पशू प्रेमी आहे’. पशूसंवर्धन व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी आणि माझा परिवार दक्षिण आफ्रिकेत सहलीला गेलेलो होतो. आम्ही तेथील शिकार केलेल्या प्राण्यांसोबत फोटो काढले आहेत. मात्र आम्ही कोणत्याही प्रकारची शिकार केलेली नाही. त्यामुळे ‘या गोष्टीचा इतका बाऊ का केला जात आहे?
मी कोणताही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कायदा तोडलेला नाही. आता आम्हांला आमचं खाजगी आयुष्यही उरलेलं नाही का?’ ‘पण आता असे फोटो काढल्याचे दु:ख वाटत आहे. मला अशी नको असणारी प्रसिद्धी नको होती’. असं म्हणणं आहे ते म्हणजे शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान याचं.
राष्ट्रवादीच्या मंत्री फौजिया खान यांना आपण कुठेही चूक आहोत असं वाटत नाही. कारण की, ती माझी खाजगी सहल होती, मी कोणत्याही शासकिय दौऱ्यावर गेलेली नव्हती असंही त्याचं म्हणणं आहे. मात्र असं वागणं योग्य आहे का? यावर त्या गोष्टीचं समर्थनच करताना शिक्षण राज्यमंत्री दिसल्य़ा.