मर्दानी खेळ लेझीमचा विक्रम, गिनीजमध्ये नोंद

`लेझीम` हा  महाराष्ट्राचा मर्दानी खेळ, आणि  याच  क्रीडा  प्रकारात  सांगली  शिक्षण  संस्थेच्या मुलांनी आज ऐतिहासीक कामगिरी केली आहे. प्रजासत्ताक  दिनाच्या  दिवशी ७ हजार ३३८ विध्यार्थिनीनी महालेझीम सादर करून नवा  विश्वविक्रम  केला आहे. या विश्वविक्रमाची  नोंद `गिनीज बुक  ऑफ वल्ड रेकोर्ड` मध्ये करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 26, 2014, 08:32 PM IST

www.24taas.com झी मीडिया , सांगली
`लेझीम` हा  महाराष्ट्राचा मर्दानी खेळ, आणि  याच  क्रीडा  प्रकारात  सांगली  शिक्षण  संस्थेच्या मुलांनी आज ऐतिहासीक कामगिरी केली आहे. प्रजासत्ताक  दिनाच्या  दिवशी ७ हजार ३३८ विध्यार्थिनीनी महालेझीम सादर करून नवा  विश्वविक्रम  केला आहे. या विश्वविक्रमाची  नोंद `गिनीज बुक  ऑफ वल्ड रेकोर्ड` मध्ये करण्यात आली आहे.
सांगलीतल्या १८ शाळेतील विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. सांगलीतल्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये हा विश्वविक्रम करण्यात आलाय. लाखो लोकांनी हा विश्वविक्रम याचि देही याची डोळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.  सांगली शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या गेल्या वर्षभराच्या मेहनतीचे चीज झाले.
जागतिक विक्रमाची नोंद करीत गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली. गिनीज बुक वल्डचे प्रतिनिधी निखिल शुक्ल यांनी संचालक विजय भिडे यांना या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र दिले.          
      
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.