त्या नो बॉलवर अश्विन बोलला

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. त्या मॅचमध्ये अश्विन आणि पंड्यानं टाकलेल्या नो बॉलमुळे भारताचा पराभव झाला अशी टीका अनेकांनी केली.

Updated: Apr 8, 2016, 06:03 PM IST
त्या नो बॉलवर अश्विन बोलला title=

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. त्या मॅचमध्ये अश्विन आणि पंड्यानं टाकलेल्या नो बॉलमुळे भारताचा पराभव झाला अशी टीका अनेकांनी केली. या टीकेवर आता अश्विननं प्रत्युत्तर दिलं आहे. 

त्या नो बॉलमुळे मला व्हिलन ठरवू नका, मी पुढचे तीन दिवस पेपर वाचला नाही, लोक काय म्हणत आहेत हे मी वाचलं नाही. 

अनेक पत्रकार आणि जाणकार म्हणाले की मी अनेक वर्षांमध्ये नो बॉल टाकला नाही. पण त्या नो बॉलमुळे मी व्हिलन होत नाही. जर त्यांना तसं वाटत असेल तर याचं उत्तर कसं द्यायचं हे मला माहित नाही, असंही अश्विन म्हणाला आहे. 

तसंच पत्रकरांनी जबाबदारीनं लिहीलं पाहिजे, कारण त्यांच्या लिखाणामुळे अनेक जण स्वत:चं मत बनवतात, असा सल्लाही अश्विननं दिला आहे.