धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेलला रुग्णालयात केलं दाखल

वेस्टइंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल हा रुग्णालयात भर्ती आहे. त्याने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण त्या फोटोमध्ये तो कोणत्याही प्रकारे गंभीर स्थितीत असल्याचं दिसत नाही आहे. तो त्या फोटोत हसतांना दिसतोय. त्याला एक ग्लुकोजची हॉटल चढवली असल्याचं दिसतंय. 

Updated: Jan 9, 2017, 10:53 AM IST
धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेलला रुग्णालयात केलं दाखल

मुंबई : वेस्टइंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल हा रुग्णालयात भर्ती आहे. त्याने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण त्या फोटोमध्ये तो कोणत्याही प्रकारे गंभीर स्थितीत असल्याचं दिसत नाही आहे. तो त्या फोटोत हसतांना दिसतोय. त्याला एक ग्लुकोजची हॉटल चढवली असल्याचं दिसतंय. 

गेलला रुग्णालयात का दाखल केलं याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ते अजून गुलदस्त्यातच आहे. टीम इंडियाचा माजी धडाकेबाज बॅट्समन विरेंद्र सेहवागने ट्विट करत यावर त्यांची विचारपूस केली आहे. सेहवागने ट्विट करत म्हटलं आहे की, 'सगळ्या जगाचा किंग तू लवकरच बरा होशील आणि तू खूप वर्ष जगशील पण तुला काय झालं आहे.?' यावर गेलने ट्विट करत म्हटलं आहे की, 'काळजी करण्यासाठी धन्यवाद. कारण नंतर सांगेल.'