वर्ल्ड कप २०१५: मोहम्मद शमीचे झाली डोप टेस्ट

 टीम इंडियाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी याचे डोप टेस्टिंग करण्यात आले. त्याचे डोप टेस्टिंग ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये करण्यात आले आहे. 

Updated: Feb 20, 2015, 02:17 PM IST
वर्ल्ड कप २०१५:  मोहम्मद शमीचे झाली डोप टेस्ट  title=

मेलबर्न :  टीम इंडियाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी याचे डोप टेस्टिंग करण्यात आले. त्याचे डोप टेस्टिंग ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये करण्यात आले आहे. 

डोप टेस्टिंग आयसीसीकडून करण्यात येते. हे टेस्टिंग प्रत्येक खेळाडूचे करण्यात येते. शमीच्या रॅन्डम डोप टेस्टचा रिझल्ट अजून आलेला नाही. 

पाकिस्तानला नमविल्यानंतर आता भारताचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. सध्या टीम इंडिया नेटमध्ये घाम गाळत आहेत. 

२२ फेब्रुवारीला हा सामना होणार असून या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करीत आहेत. दक्षिण आफ्रिका विश्व चषकात कधीही भारताकडून पराभूत झालेला नाही. त्यामुळे आता भारतावर दबाव आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.