भारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी आनंदाची बातमी

पाकिस्तान आणि बांग्लादेशचा पराभव करुन भारतीय संघ आता सेमीफायनलच्या दिशेने पुढे निघाला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.

Updated: Mar 27, 2016, 05:06 PM IST
भारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी आनंदाची बातमी

मोहाली : पाकिस्तान आणि बांग्लादेशचा पराभव करुन भारतीय संघ आता सेमीफायनलच्या दिशेने पुढे निघाला आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्या आधी भारतासाठी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आज या मोठ्या सामन्या आधी याच मोहालीच्या मैदानावर भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियासोबत होत आहे आणि याचा फायदा भारतीय स्पिनर्सला होणार आहे. कारण या पिचवर ४० ओव्हर हे आधी खेळले गेले असतील.

भारतीय महिला टीमच्या खेळाडू या पिचवर खेळतायंत त्यामुळे त्यांची कामगिरी कशी आहे यावरुन ही भारतीय संघाला पिचचा अंदाज येईल. भारतीय स्पिनर्स हे ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर्सपेक्षा येथे अधिक चांगली कामगिरी करु शकतील त्यामुळे याचा फायदा नक्कीच भारतीय टीमला होईल.