मुंबई : भारतीय टीममधले बरेच खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकतायत, यामध्ये आता विराट कोहलीचाही समावेश व्हायची शक्यता आहे. विराट आणि अनुष्का शर्मा लवकरच लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुलतानचं बुडापेस्टमधलं शूटिंग संपल्यानंतर अनुष्कानं दिल्लीमध्ये विराटच्या आईची आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्याची बातमी पिंक व्हिलानं दिली आहे. यानंतर हे दोघं सुट्टीवर एकत्र गेल्याच्याही चर्चा आहेत. विराट-अनुष्काच्या सुट्टीच्या ठिकाणाची माहिती मात्र मिळू शकलेली नाही.
याआधी विराट आणि अनुष्काचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, पण त्यानंतर विराट आणि अनुष्का मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये एकत्र दिसले, तसंच टी 20 वर्ल्ड कप वेळी ट्विटरवर विराटवरून अनुष्का शर्मावर टीका करण्यात आली. यावरून विराट कोहली चांगलाच भडकला होता आणि त्यांनी ट्विटरवर या सगळ्या टीका करणाऱ्यांना सुनावलं होतं.
सुलतानच्या शूटिंगवेळी बुडापेस्टला जातना विराट कोहली अनुष्काला मुंबई विमानतळावर सोडायला आला होता, यामुळे या दोघांचं पुन्हा एकदा पॅच अप झाल्याचा चर्चा सुरु झाल्या.