मुंबई : 'बीसीसीआय'च्या कामकाजामध्ये दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला जाणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधले 'त्रिमूर्ती' नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर, 'द वॉल' राहुल द्रविड आणि 'दादा' सौरव गांगुली है तिघे दिग्गज आपल्याला एकत्र खेळताना दिसणार नसले तरी आता ते एकत्र काम करताना क्रिकेट फॅन्सला पाहता येणार आहे. या तिघांच्या अनुभवाचा फायदा बीसीसीआय करुन घेणार असून त्यांना कोणत्या पदावर नियुक्त करता येईल यावर सध्या बीसीसीआयमध्ये चर्चा सुरु आहे. या तिघांशीही बीसीसीआय वैयक्तिरित्या चर्चा करणार असून त्यानंतर बीसीसीआयमधील त्यांच्या भूमिका स्पष्ट होतील, अशी माहिती बीसीसीआयचे सेक्रेटरी अनुराग ठाकूर यांनी दिलीय.
'बीसीसीआय'मध्ये सत्ता बदल झाला आणि 'बीसीसीआय'च्या धोरणात होत असलेला बदलही आता प्रामुख्यानं दिसू लागला आहे. माजी क्रिकेटपटूंच्या अनुभवाचा फायदा टीम इंडियाच्या विकासासाठी केला जाईल ही भूमिका बीसीसीआयनं घेतील असून आता बीसीसीआयच्या कामकाजामध्येही आपल्याला दिग्गज क्रिकेटपटू कार्यरत झालेले पहायला मिळतील. यामुळे क्रिकेट संघटनांमधील राजकारण थोडंफार तरी कमी होईल अशी आशा क्रिकेट फॅन्स बाळगून आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.