मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्या बॉलिवूडमधील प्रवेशाबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अभिनेता शाहिद कपूरसोबत ती चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार असल्याची बातमी सर्वत्र फिरत आहे.
सचिनची मुलगी म्हटल्यावर सर्वांनाच तिच्याबद्दल उत्सुकता असणार हे निश्चित.. पण खुद्द सचिन मात्र या अफवांनी भलताच वैतागला असून त्यानं सरळ या वृत्ताचं खंडन केलंय. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरून त्यानं हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
'माझी मुलगी सारा सध्या शिक्षण घेण्यात मग्न आहे. ती चित्रपटात काम करणार असल्याच्या निरर्थक अफवांनी वैतागलो आहे', असं ट्विट सचिननं केलंय. आता खुद्द सचिननंच या वृत्ताचं खंडन केल्यावर तरी या सर्व अफवांना पूर्णविराम मिळेल, अशी आशा आहे.
My daughter Sara is enjoying her academic pursuits. Annoyed at all the baseless speculation about her joining films.— sachin tendulkar (@sachin_rt) April 27, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.