संगकाराला निरोप, सोशल मीडियावर #ThankYouSanga ट्रेंड

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोच्या पी. सारा ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं आपली पकड मजबूत केलीय. श्रीलंकेला जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी ३४१ रन्सची गरज आहे. भारताला जिंकण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे. 

Updated: Aug 23, 2015, 08:11 PM IST
संगकाराला निरोप, सोशल मीडियावर #ThankYouSanga ट्रेंड title=

कोलंबो: भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोच्या पी. सारा ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं आपली पकड मजबूत केलीय. श्रीलंकेला जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी ३४१ रन्सची गरज आहे. भारताला जिंकण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे. 

श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू कुमार संगकारा याची आजची इनिंग त्याच्या कारकीर्दीतील अखेरची इनिंग होती. संगकारा आज मैदानात उतरला तो आपली अखरेची टेस्ट खेळण्यासाठी. मात्र १८ रन्सवर अश्विनच्या बॉलवर संगकारा आऊट झाला.

संगकारानं आज मैदानात येताच अश्विनच्या बॉलवर दोन रन्स करत खातं उघडलं. यानंतर तीन चौकार पण लावले. पण नंतर स्पिनर अश्विनच्या एका बॉलवर संगकाराची विकेट गेली, मुरली विजयनं कॅच घेतली.

संगकारा आऊट होताच काही वेळासाठी मैदानात शांतता पसरली. मात्र लगेच सर्व प्रेक्षकांनी उभं राहून संगकाराला अभिवादन केलं आणि भारतीय क्रिकेटपटूंनीही हात मिळवत त्याला निरोप दिला. अश्विननं या सीरिजमध्ये सलग चौथ्यांदा संगकाराची विकेट घेतली. 

दरम्यान, सोशल मीडियावर #ThankYouSanga हे ट्रेंड होतंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.