शरद पवार पुन्हा BCCI निवडणूक लढवणार?

एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक लढवण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केल्यानंतर शरद पवार पुन्हा बीसीसीआयची निवडणूक लढवणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. 

Updated: Feb 2, 2015, 07:50 PM IST
शरद पवार पुन्हा BCCI निवडणूक लढवणार? title=

मुंबई  : एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक लढवण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केल्यानंतर शरद पवार पुन्हा बीसीसीआयची निवडणूक लढवणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. 

दरम्यान याबाबतचा निर्णय शरद पवार आज घेण्याची शक्यता आहे. मुंबई क्रिकेट एसोसिएशनच्या सदस्यांसमवेत शरद पवार हे सध्या बातचीत करत असून लवकरच बीसीसीआय निवडणुकीबाबत त्यांची काय भूमिका असेल हे स्पष्ट होईल. 

सध्या अनेक क्रिकेट संघटनांवर असलेली भाजपची पकड आहे. जगमोहन दालमियांशी असलेली पवारांचं वैर आणि काही दिवसातच मोदी आणि शरद पवार हे बारामतीतील एकाच व्यासपीठावर येणार असल्याने तर्कवितर्कांनी चांगलाच जोर पकडला. 

शरद पवार हे सध्ये मुंबई क्रिकेट एसोसिएशनचे सदस्य असून 2005 ते 2008 दरम्यान त्यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सांभाळलं आहे. तर 2010 ते 2012 या दरम्यान ते आयसीसीचे अध्यक्षही होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.