टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना

 टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यावर रवाना झालीय. ब्रिस्बेनमध्ये 4 डिसेंबरपासून पहिला टेस्ट सामना होत आहे. त्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया काल रवाना झाली.

Updated: Nov 22, 2014, 03:13 PM IST
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना  title=

मुंबई :टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यावर रवाना झालीय. ब्रिस्बेनमध्ये 4 डिसेंबरपासून पहिला टेस्ट सामना होत आहे. त्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया काल रवाना झाली.

या दौ-यावर टीम इंडिया चार टेस्ट आणि एक ट्रँग्युलर सिरीज खेळणार आहे. 24 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबरला टीम इंडिया सराव सामना खेळणार आहे.

विशेष म्हणजे 14 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात वर्ल्डकपची सुरूवात होत आहे. त्यासाठी या दौ-याला विशेष महत्त्व आहे.

वर्ल्डकपच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन पिचेस जाणून घेण्यासाठी हा दौरा आमच्यासाठी उपयुक्त आहे असं मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.