दिल्लीचा तरूण, फेसबुकवर मुलीचे अकाऊंट

तरूण दिल्लीचा. त्याचे नाव योगिंदर सिंग. योगिंदरने इंटरनेटच्या माध्यमातून डोंबिवलीतील तरूणीचे फोटो मिळविले. हे फोटो मिळताच या तरूणीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केलं. आपल्याच नावेचे अकाऊंट असल्याचे तरूणीच्या लक्षात येताच तिने पोलिसात धाव घेतली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2013, 10:39 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
तरूण दिल्लीचा. त्याचे नाव योगिंदर सिंग. योगिंदरने इंटरनेटच्या माध्यमातून डोंबिवलीतील तरूणीचे फोटो मिळविले. हे फोटो मिळताच या तरूणीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केलं. आपल्याच नावेचे अकाऊंट असल्याचे तरूणीच्या लक्षात येताच तिने पोलिसात धाव घेतली.
डोंबिवलीतील एका मुलीचे फोटो वापरुन दिल्लीत वेगळ्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करणाऱ्या योगिंदर सिंग याच्या विरोधात डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी शनिवारी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

डोंबिवली पूर्व येथील २४ वर्षीय तरुणी एका खासगी वाहिनीवर काम करते. तिचे काही फोटो योगिंदर सिंग याने इंटरनेवरुन मिळवले आणि त्या फोटोच्या आधारे प्रिती सिंग या नावाचे बोगस फेसबुक अकाऊंट बनवले.
या बोगस अकाऊंटची माहिती मिळाल्यानंतर या मुलीने ठाणे सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर ठाणे सायबर सेलने तपास करुन योगिंदर सिंग याची माहिती घेतली असता तो दिल्लीतील मजलीस पार्क येथील राहणारा असल्याचे स्पष्ट झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.