Wedding Card Rules : लग्नपत्रिका तयार करताना अजिबात करू नका 'या' चुका, वास्तु शास्त्रातील माहिती...

Wedding Cards Vastu Tips : लग्नाची गडबड सुरु झाली आहे. या वर्षी अनेकांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. लग्नपत्रिका निवडताना काही वास्तुदोषांपासून नक्कीच दूर राहा. अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 29, 2023, 06:08 PM IST
Wedding Card Rules : लग्नपत्रिका तयार करताना अजिबात करू नका 'या' चुका, वास्तु शास्त्रातील माहिती... title=

Vastu Tips For Wedding Card : 4 महिन्यांनंतर, लवकरच लग्नसराई पुन्हा एकदा सुरू होणार आहे. म्हणूनच, जर तुम्ही लग्नपत्रिका निवडणार असाल तर काही वास्तु नियम नक्की जाणून घ्या. केवळ भावी जोडप्याचे लग्नच नाही तर वैवाहिक जीवनात कधीही अडथळे किंवा संकटे येऊ नयेत याकडे वधू-वरांचे कुटुंबीय जास्तीत जास्त लक्ष देतात.लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नपत्रिका. आजकाल लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. लग्नपत्रिका निवडताना देखील वास्तुशास्त्रानुसार विचार करावा. 

वेडिंग कार्ड्सला वेडिंग विंडो म्हणतात. कारण वधू-वर ओळखत नसलेल्या निमंत्रितांना त्यांची पहिली झलक कार्डमधून मिळू शकते. आता लोक लग्नाला खास बनवण्यासाठी वेडिंग कार्ड्सच्या डिझाईनवर अधिक भर देतात आणि वेगवेगळ्या प्रकारे कस्टमाइज करतात, पण तुम्हाला माहित आहे का की, या कस्टमायझेशनमधील वास्तुची चूक तुमचे स्वप्न भंग करू शकते.  सुखी वैवाहिक जीवनासाठी लग्नपत्रिका निवडताना कोणते वास्तु नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमचं वैवाहिक आरोग्य अधिक सुखकर होऊ शकतं.

लग्नपत्रिका निवडताना काय काळजी घ्याल?

  • त्रिकोण किंवा पानांच्या आकारात कार्ड निवडणे टाळा.वास्तू तज्ञांच्या मते पारंपारिक आयताकृती किंवा चौकोनी लग्नपत्रिका शुभ असतात.
  • लग्नपत्रिकेत वधू-वरांचे फोटो टाकणे टाळा. लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो लावणे वास्तूनुसार अशुभ असल्याचे वास्तू तज्ञ सांगतात.
  • लग्नाच्या कार्डवर कधीही काळ्या आणि तपकिरी रंगाचा वापर करू नका. असे मानले जाते की, हे दोन्ही रंग लग्नासाठी अशुभ आहेत. परिणामी वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
  • लग्नाच्या कार्डमध्ये नेहमी गणपतीचे संपूर्ण चित्र समाविष्ट करा. जसे रिकाम्या सोंडे किंवा प्रतिकात्मक चित्रे किंवा नाचत असलेल्या गणपतीची फोटो लावल्याने वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
  • लग्नाच्या कार्डावर तुम्ही सुगंधित कागद वापरू शकता. चंदन, गुलाब, चमेलीच्या सुगंधाने सकारात्मक ऊर्जा मिळते.
  • लग्नाच्या कार्डसाठी लाल किंवा मरून रंग सर्वात शुभ आहे. तुम्ही पिवळा किंवा गुलाबी रंगही वापरू शकता.
  • वास्तू तज्ज्ञ लग्नपत्रिकेत राधा-कृष्ण ठेवणे टाळा. कारण राधा कृष्ण जरी शाश्वत प्रेमाचे प्रतीक असले तरी त्यांचे जीवन दु:ख आणि वेदनांनी भरलेले आहे. राधाकृष्ण यांना आयुष्यात कधीच भेटले नाही. त्यामुळे त्यांची छायाचित्रे लग्नपत्रिकेत वापरण्यास परवानगी नाही.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)