नवी दिल्ली : आपल्या शरीरावर हिंदी भाषेत टॅटू बनवणा-या विदेशी खेळाडूंच्या यादीत आता आणखी एका खेळाडूच नाव सामिल झालं आहे.
ईंग्लिश प्रीमीयर लीगमध्ये आर्सेनालकडून खेळणारा ब्रिटीश फुटबॉल खेळाडू थियो वाल्कोट ने आपल्या पाठीवर भगवान शिवाला आठवत टॅटू बनवला आहे. याआधी इंग्लंडचा स्टार फुटबॉलर डेव्हिड बेकहॅमने त्याच्या दंडावर पत्नी व्हिक्टोरीया असे लिहीले होते. तर रशियाची टेनिस स्टार खेळाडू मारिया शारापोवा हिने मानेवर हिंदीत जीत असे लिहिले होते.
Open your heart, shed fear, hate or envy, to experience everlasting joy & happiness #NewTattoo pic.twitter.com/R0Qksj4vk5
— Theo Walcott (@theowalcott) August 9, 2017
आता इंग्लिश फुटबॉल खेळाडू थियो वाल्कोट याने आपल्या पाठीवर ओम नमः शिवाय मंञाचा टॅटू बनवून घेतला आहे. आर्सेनाल टीम इंग्लिश प्रीमीयर लीग किताब जिंकेल किंवा नाही हा विषय वेगळा आहे.
As an Indian, I feel very proud to see this tattoo on an arsenal player https://t.co/gpIEvLLDYj
— Jugal (@jugal_ambasana) August 9, 2017
हर हर महादेव ! Always knew Right Wing was your best position https://t.co/a65BmR76Fa
— Raj Singh (@NoMoreDatGuy) August 9, 2017
माञ, वाल्कोटने आपल्या नव्या टॅटूने त्याने लाखो फुटबॉल चाहत्यांचं मन नक्कीच जिंकलं आहे. हा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत वाल्कोट आपली पाठ दाखवत लिहीतो की, आपलं मन मोकळं करा, भीती, द्वेषाला काढून टाका. जेणेकरून कधीही न संपणा-या आनंदाचा अनुभव घेऊ शकाल.