'विराट' विक्रमावर बीसीसीआयच्या फक्त एका शब्दात शुभेच्छा

विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.

Updated: Oct 25, 2018, 09:26 PM IST
'विराट' विक्रमावर बीसीसीआयच्या फक्त एका शब्दात शुभेच्छा title=

विशाखापट्टणम : विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराटनं १० हजार रन पूर्ण केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये एवढ्या जलद १० हजार रन पूर्ण करणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटनं २०५व्या इनिंगमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटला हा टप्पा ओलांडायला ८१ रनची गरज होती. सचिन तेंडुलकरनं हे रेकॉर्ड २५९ इनिंगमध्ये केलं होतं.

वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करणारा विराट १३वा खेळाडू बनला आहे. याआधी वनडेमध्ये सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या, महेला जयवर्धने, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, राहुल द्रविड, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान आणि एम.एस. धोनी यांनी वनडेमध्ये १० हजार रनचा टप्पा ओलांडला आहे.

वनडेमध्ये १० हजार रन केल्याचा मला अभिमान असल्याचं विराट म्हणाला. विराटनं एवढं मोठं रेकॉर्ड केलं असलं तरी बीसीसीआयनं फक्त एका शब्दामध्येच विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट केलं आहे. बीसीसीआयनं त्यांच्या ट्विटमध्ये विराटला शुभेच्छा देताना 'GOAT'असं लिहिलं आहे. 'GOAT' म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. 

BCCI