क्रिकेटप्रेमींसाठी मेजवाणी! टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, 'या' संघाबरोबर पहिल्यांदाच टी20 मालिका

Team India home season: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाचं वर्ष 2023-24 साठीचं मायदेशातलं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टीम इंडियाचं वेळापत्रक प्रचंड व्यस्त असून याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेने होणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 25, 2023, 09:01 PM IST
क्रिकेटप्रेमींसाठी मेजवाणी! टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, 'या' संघाबरोबर पहिल्यांदाच टी20 मालिका title=

Team India home season 2023-24: बीसीसीआयने (BCCI) वर्ष 2023-24 साठी टीम इंडियाचं (Team India) मायदेशातील वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. आगामी वेळापत्रकात टीम इंडिया एकूण 16 आंतरराष्ट्रीय सामने (Internation Matchs) खेळणार आहे. यात 5 कसोटी सामने, 3 एकदिवसीय आणि 8 टी20 सामने खेळणार आहे. टीम इंडिया 2024 वर्षाची सुरुवात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने करणार आहे. ही मालिका अशा संघाविरुद्ध असेल ज्या संघाविरुद्ध भारताने आतापर्यंत टी20 मालिका खेळली नाही.

बीसीसीआयने जाहीर केलं वेळापत्रक
टीम इंडिया 2023-24 वर्षात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचा (Australia) सामना करणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 च्या आधी म्हणजे 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरदरम्यान ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघात 5 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. ही टी20 मालिका 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत खेळवली जाईल. 

या देशाविरुद्ध पहिल्यांदाच टी20 मालिका
नव्या वर्षाच्या सुरुवातील अफगाणीस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान (Afghanistan) पहिल्यांदाच टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना, मोहाली, दुसरा सामना इंदोर आणि तिसरा सामना बंगळुरुमध्ये रंगणार आहे.  11 जानेवारी ते 17 जानेवारीदरम्यान ही मालिका रंगेल. अफगाणिस्तानंतर इंग्लंड भारताचा दौरा करणार आहे. यात भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 

भारत-ऑस्ट्रेलिया 3 एकदिवसीय सामने

पहिला एकदिवसीय सामना - 22 सप्टेंबर, मोहाली
दुसरा एकदिवसीय सामना - 24 सप्टेंबर, इंदोर
तिसरा एकदिवसीय सामना - 27 सप्टेंबर, राजकोट

भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिका

पहिला टी20 सामना - 23 नोव्हेंबर, विशाखापट्टनम
दूसरा टी20 सामना -  26 नोव्हेंबर, तिरुवनंतपुरम
तीसरा टी20 सामना - 28 नोव्हेंबर, गुवाहाटी
चौथा टी20 सामना - 1 डिसेंबर, नागपूर
पाचवा टी20 सामना - 3 डिसेंबर, हैदराबाद

भारत-अफगाणीस्तान टी20 मालिका
पहिला टी20 सामना - 11 जानेवारी 2024, मोहाली
दूसरा टी20 सामना - 14 जानेवारी 2024, इंदोर
तीसरा टी20  सामना - 17 जानेवारी 2024, बंगलुरु

इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका
पहिला कसोटी सामना- 25-29 जानेवरी 2024, हैदराबाद
दूसरा कसोटी सामना - 2-6 फेब्रुवारी 2024, विशाखापट्टनम
तीसरा कसोटी सामना - 15-19 फेब्रुवारी 2024, राजकोट
चौथा कसोटी सामना - 23-27 फेब्रुवारी 2024, रांची
पांचवां कसोटी सामना - 7-11 मार्च 2024, धर्मशाला