मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेचा कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने (IND vs SL Test Series 2022) धुव्वा उडवला. टीम इंडियाला आणि खेळाडूंना या धमाकेदार कामगिरीचा फायदा झाला आहे. आयसीसीने कसोटी क्रमवारी (Icc Test Rankings) जारी केली आहे. यात टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. तर काहींना मोठा तोटा झालाय. टीम रँकिंगमध्ये टीम इंडिया 118 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर श्रीलंका 81 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. (icc test rankings jasprit bumrah leaps in no 4 rank and virat kohli slips to 9th position in batters ravindra jadeja shreyas iyer jason holder)
आयसीसी बॅटिंग रँकिंग (Icc Test Bating Rankings)
बॅटिंग रँकिंगमध्ये विराट कोहलीला (Virat Kolhi) जबर नुकसान झालंय.विराटला चार स्थानांचं नुकसान झालंय. त्यामुळे विराटची 9 व्या स्थानी घसरण झालीय. तर श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत 'मॅन ऑफ द सीरिज' ठरलेला रिषभ पंत (Rishabh Pant) 10 व्या स्थानी कायम आहे. तर श्रेयस अय्यर 37 व्या स्थानी पोहचलाय.
विराटने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 45 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या टेस्टमध्ये 23 आणि 13 धावांचं योगदान दिलं. विराटला सातत्याने मोठी खेळी करण्यास अपयश येतंय. विराटला याच कामगिरीचा फटका बसला अन् त्याला 4 स्थानांचं नुकसान झालं.
दुसऱ्या बाजूला रिषभ पंतने धमाकेदार कामगिरी केली. रिषभने पहिल्या कसोटीत 96, तर दुसऱ्या मॅचमध्ये 39 आणि 50 धावा ठोकल्या. पंतने केलेल्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला 10 वं स्थान कायम ठेवण्यात यश आलंय.
तसेच श्रेयस अय्यरने (Shreys Iyer) पहिल्या टेस्टमध्ये 27, दुसऱ्या कसोटीत 92 आणि 67 धावा केल्या. श्रेयस दोन्ही डावात अर्धशतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला. त्याला या कामगिरीचं यश मिळालं.
'बुम बुम बुमराह'
जसप्रीत बुमराहला (Japsrit Bumrah) श्रीलंका विरुद्धच्या कसोटी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. बुमराहने बॉलिंगसह ही जबाबदारी सार्थपणे पार पाडली. बुमराहने या मालिकेत एकूण 10 विकेट्स घेतल्या. बुमराहने एकाच डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली.
बुमराहला या शानदार कामगिरीचा मोठा फायदा झाला. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने मोठी झेप घेत पहिल्या पाचात उडी घेतलीय. बुमराहने बॉलिंग 6 स्थानांची झेप घेत रँकिंगमध्ये 10 व्या स्थानावरुन चौथ्या स्थानी उडी घेतलीय.
बुमराहचे 830 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर आर अश्विन दुसऱ्या स्थानी कायम आहे. मोहम्मद शमीला (Mohammed Shami) एका स्थानाचा फायदा झाल्याने तो 17 व्या क्रमांकावर आलाय.
तर ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) पछाडत जेसन होल्डरने (Jason Holder) अव्वल स्थान पुन्हा मिळवलंय. यामुळे जाडेजाची दुसऱ्या स्थानी घसरण झालीय. तर अश्विन तिसऱ्या स्थानी कायम आहे.
Jasprit Bumrah breaks into top 5
Jason Holder reclaims top spot
Dimuth Karunaratne risesSome big movements in the latest @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings
Details https://t.co/MQENhZlPP8 pic.twitter.com/8OClbDeDtS
— ICC (@ICC) March 16, 2022