भारत-न्यूझीलंड सामन्यात जिंकेल तो संघ सेमीफानलमध्ये, पाहा कसं आहे समीकरण

World Cup 2023 Semifinal: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आता प्रत्येक सामन्यानंतर सेमीफानयलचं समीकरण बदलत चाललं आहे. भारत आणि न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत आहे. रविवारी या दोन संघांमध्ये रविवारी सामना रंगणार असून सेमीफायलच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 20, 2023, 09:34 PM IST
भारत-न्यूझीलंड सामन्यात जिंकेल तो संघ सेमीफानलमध्ये, पाहा कसं आहे समीकरण title=

India and New Zealand: आयसीसी विश्वचषकात आता प्रत्येक सामना रंगतदार आणि चुरशीचा होत आहे. प्रत्येक सामन्यातनंतर सेमीफायनलचं समीकरण बदलंय. यजमान भारत (India) आणि गेल्या विश्वचषकातील उपविजेता संघ न्यूझीलंड (New Zealand) अजिंक्य राहिले आहेत. या दोघांनी प्रत्येकी चार सामने जिंकले असून सेमीफायनलमधलं (Word Cup Semifinal) आपलं स्थान आणखी भक्कम केलंय. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये दोन स्थानांसाठी जबरदस्त चुरस असणार आहे. 

कसं आहे सेमीफायनलचं समीकरण
विश्वचषक पॉईंटटेबलमध्ये न्यूझीलंड आणि भारत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडने चार सामने जिंकले असून त्यांचा रनरेट +1.923 इतका आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतानेही चार सामने जिंकलेत. भारताचा रनरेट +1.659 इतका आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघ प्रत्येक संघाबरोबर सामने खेळेल. म्हणजे प्रत्येक संघाचे प्रत्येकी नऊ सामने खेळवले जातील. सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी 9 पैकी 7 सामने जिंकावे लागणार आहेत. अशात भारत आणि न्यूझीलंडने नऊ पैकी चार सामने जिंकले असून या दोन संघांना सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी उरलेल्या पाच पैकी आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. 

तर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ प्रत्येकी दोन विजयासह तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय. त्यांचा रनरेटही चांगला आहे. तर पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा रनरेट निगेटिव्हमध्ये आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या दोन जागांसाठी या चार संघांमध्ये संघांमध्ये जबरदस्त चुरस असणार आहेत. 

भारत-न्यूझीलंड सामना
स्पर्धेत अपराजीत असलेल्या भारत आणि न्यूझीलंडदरम्यान रविवारी म्हणजे 22 ऑक्टोबरला सामना रंगणार आहे. दोघांपैकी एका संघाच्या विजयाची मालिका थांबणार आहे. 2003 नंतर टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत केलेलं नाही. या हंगातही न्यूझीलंडचा संघ मजूबत आहे. डेवॉन कॉनवे, डेरिल मिचेल, ऑलराऊंडर रचिन रविंद्र जबरदस्त फॉर्मात आहेत. पण टीम इंडियाची कामगिरीही दणक्यात होतेय. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल हे प्रमुख फलंदाज चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे हा सामना जबरदस्त चुरशीचा होणार हे नक्की.

टीम इंडियाने आतापर्यंत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला आहे. तर न्यूझीलंडने इंग्लंड, नेदरलँडर, बांगलादेश आणि अफगाणिस्तानवर मात केलीय.