VIDEO: जडेजाच्या 'Magic Ball' ने उडवले स्टंप्स, कीवी फलंदाज बघतच बसला, मैदानात उडाली खळबळ

IND VS NZ 1st Test : बंगळुरू टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना क्लीन बोल्ड करत त्याने सामन्यात टीम इंडियाचे कमबॅक करून दिले. 

पुजा पवार | Updated: Oct 18, 2024, 12:19 PM IST
VIDEO: जडेजाच्या 'Magic Ball' ने उडवले स्टंप्स, कीवी फलंदाज बघतच बसला, मैदानात उडाली खळबळ  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS NZ 1st Test : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजामुळे बंगळुरू टेस्टमध्ये टीम इंडियाचं पुनरागमन झालं आहे. बंगळुरू टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) घातक गोलंदाजी केली ज्याची कोणीही आशा केली नव्हती. न्यूझीलंडने वेगवान गोलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या दिवशी भारताचा खेळ 46 धावांवर आटोपला होता. दुसऱ्या दिवशीचा खेळ जेव्हा संपला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर 3 विकेटवर 180 धावा असा होता. न्यूझीलंडकडे 134 धावांची आघाडी होती. तिसऱ्या दिवशी वाटले की न्यूझीलंडची फलंदाजी भारतीय गोलंदाजांवर भारी पडेल. पण रवींद्र जडेजाने तसे होऊ दिले नाही, बंगळुरू टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना क्लीन बोल्ड करत त्याने सामन्यात टीम इंडियाचे कमबॅक करून दिले. 

जडेजाच्या 'Magic Ball'ने उडवले स्टंप्स : 

रवींद्र जडेजाने बंगळुरू टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा सर्वात खतरनाक फलंदाज ग्लेन फिलिप्स याला क्लीन बोल्ड करून मैदानात उडाली खळबळ उडवून दिली. रवींद्र जडेजाने खतरनाक फलंदाज ग्लेन फिलिप्सला आउट केले. जडेजाने टाकलेला बॉल ग्लेन फिलिप्सला काहीही कळण्याच्या आत हा थेट स्टंप्सवर जाऊन आदळला. त्यानंतर 65 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर सुद्धा रवींद्र जडेजाने मॅट हेनरीची विकेट घेतली. अशा प्रकारे न्यूझीलंडच्या दोन्ही बड्या खेळाडूंना बोल्ड आउट करून रवींद्र जडेजाने सामन्यात टीम इंडियाचे कमबॅक करून दिले. ग्लेन फिलिप्सने 18 बॉलवर 14 धावा तर मॅट हेनरी 9 बॉलवर 8 धावा केल्या होत्या. सध्या जडेजाने घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

हेही वाचा : रोहित शर्माने चूक कबूल केली, लाजिरवाण्या खेळीनंतर म्हणाला 'मला पीच नीट वाचता आली नाही...'

 

पाहा व्हिडीओ : 

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके