रांची | टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने मालिका जिंकली. टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. तर अखेरीस रिषभ पंतने एकाहीत सिक्स खेचत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. (ind vs nz 2nd t 20i team india beat new zealand by 7 wickets and win series at jharkhand State Cricket Association Stadium)
शतकी सलामी भागादारी
विजयी आव्हानाच पाठलाग करायला आलेल्या रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीने टीम इंडियाला शानदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी 117 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतकी खेळी केली. केएलने 49 चेंडूत 6 फोर आणि 2 सिक्स खेचले. तर रोहितने 36 चेंडूत 5 सिक्स आणि 1 फोरसह 55 धावांची खेळी केली. तसेच वेंकटेश अय्यर आणि रिषभ पंतने प्रत्येकी नाबाद 12 धावा केल्या.
मालिका विजय
य विजयासह टीम इंडियाने मालिका खिशात घातली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने एकतर्फी आघाडी घेतली आहे. दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 21 नोव्हेंबरला कोलकातामध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाचे शिलेदार | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि हर्षल पटेल.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टीम साऊथी (कॅप्टन), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, एम चॅम्पमॅन, ग्लेन फिलीप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, इश सोढी आणि ट्रेन्ट बोल्ट.