जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये १८७ रन्सवर ऑल आऊट झाल्यावर भारतीय बॉलर्सनीही आफ्रिकेच्या बॅट्समनची दाणादाण उडवली आणि १९४ रन्सवर आफ्रिकेला ऑल आऊट केलं. यामुळे दक्षिण आफ्रिकेला ९ रन्सची मामुली आघाडी मिळाली आहे.
भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वर कुमारला ३ विकेट्स मिळाल्या. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलानं सर्वाधिक ६१ रन्स केल्या. दुसऱ्या दिवसाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेनं ६/१ अशी केली होती.
तत्पूर्वी पहिल्या दिवशी भारताची पहिली इनिंग १८७ रन्सवर ऑल आऊट झाली. टॉस जिंकून भारतानं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण ओपनिंगला आलेला के.एल.राहुल शून्य रन्सवर आणि मुरली विजय ८ रन्सवर आऊट झाला.
पहिल्या दोन विकेट झटपट गेल्यानंतर पुजारा आणि कोहलीनं भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. पुजारा आणि कोहलीनं अर्धशतक केलं पण मोठा स्कोअर करण्यात दोघांनाही अपयश आलं. पण या सगळ्यामध्ये चेतेश्वर पुजाराच्या नावावर एक लाजिरवाणं रेकॉर्ड झालं आहे. ५३ बॉल्स खेळल्यावर चेतेश्वर पुजाराला पहिली रन काढता आली. या दोघांची विकेट पडल्यावर मात्र भारताची बॅटिंग गडगडली.
तीन टेस्ट मॅचची ही सीरिज भारतानं आधीच गमावली आहे. केप टाऊनमध्ये आणि सेंच्युरिअनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला व्हाईट वॉश टाळण्याचं आव्हान भारतापुढे असणार आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.