रांची | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सीरिजमधील (India vs New Zealand T 20 Series 2021 ) दुसरी मॅच आज (19 नोव्हेंबर) रांचीतील झारखंड क्रिकेट स्टेडियममध्ये (Jharkhand State Cricket Association Stadium) खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे रोहितसेना मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. किंवींसाठी हा 'करो या मरो'चा सामना आहे. या दुसऱ्या सामन्याआधी उभयसंघांची कामगिरी कशी राहिली आहे, हे जाणून घेऊयात. (india vs New zealand 2nd t 20 See head to head records)
हेड टु हेड रेकॉर्ड
टीम इंडिया आणि न्यूझीलंड टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 18 सामन्यांमध्ये भिडले आहेत. या 18 पैकी 9 सामन्यांमध्ये किंवींनी विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 7 वेळा न्यूझीलंडचा पराभव केला आहे. उर्वरित 2 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
आकडेवारी पाहता न्यूझीलंड वरचढ आहे. मात्र टीम इंडियाला होम कंडिशनचा फायदा असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाची जमेची बाजू आहे. मात्र न्यूझीलंडला गृहीत धरुन चालणार नाही. यामुळे हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका जिंकणार की न्यूझीलंड मालिकेतील आव्हान कायम राखणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान, ईशान खान आणि ऋतुराज गायकवाड.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | टीम साऊथी (कॅप्टन), टीम सायफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, ग्लेन फिलीप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, टोड एस्टेल, लॉकी फर्गुयसन, ट्रेन्ट बोल्ट, एडम मिल्ने, इश सोढी आणि जेम्स निशाम.